Home Featured सीमांकनात अडथळे नकोत

सीमांकनात अडथळे नकोत

0

>> मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शेळ मेळावली येथील आयआयटीच्या जमिनीचे सीमांकन करण्याचे काम सुरू आहे. तथापि, काही अडथळ्यामुळे जमीन सीमांकन करण्याचे काम बंद पडले आहे. सीमांकनाचे काम पुन्हा एकदा सुरू केले जाणार असून स्थानिकांनी जमिनीच्या सीमांकनाच्या कामात अडथळा आणू नये. तर, स्थानिकांनी त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पुन्हा एकदा केले आहे.
दरम्यान, काल रविवारीही शेळावलीवासीय आंदोलनासाठी रस्त्यावर बसून होते. मात्र त्या ठिकाणी पोलीस नव्हते. तसेच काल सीमांकनासाठीही कोणीही अधिकारी तिथे फिरकले नाहीत. सोमवार ते शुक्रवार आंदोलनासाठी बसणारे आयआयटीविरोधक बुधवारी झालेल्या धुमश्‍चक्रीनंतर आता शनिवारी व रविवारीही आंदोलन करत असल्याचे दिसून आले.