सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ

0
208

तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ केली आहे. घरांमध्ये वापरल्या जाणार्‍या १४.२ किलो वजनाचा सिलिंडर ५० रुपयांनी तर पाच किलोचा सिलिंडर १८ रुपयांनी वाढवला आहे. तर १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६.५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. गॅस सिलिंडरवर देण्यात येणार्‍या सबसिडीअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १२ गॅस सिलिंडरवर सूट देते. ग्राहकांना या कालावधीमध्ये अधिक सिलिंडर लागले तर त्यांना बाजार भावात ते विकत घ्यावे लागतात.