सिद्दिकी पलायन प्रकरणात अमित पालेकर यांची आज पुन्हा चौकशी

0
9

जुने गोवे पोलिसांनी जमीन घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याच्या पोलीस कोठडीतून पलायन प्रकरणाच्या चौकशीसाठी आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत. ॲड. अमित पालेकर यांना शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जुने गोवे पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

जुने गोवे पोलिसांनी संशयित आरोपी सिद्दिकी खान याच्या पोलीस कोठडीतून पलायन प्रकरणी आतापर्यंत दोन वेळा ॲड. अमित पालेकर यांची चौकशी केली आहे. जुने गोवे पोलिसांनी सिद्दिकीच्या पोलीस कोठडीतून पलायन प्रकरणात पणजी येथील न्यायालयात आरोपपत्र सुध्दा दाखल केले आहे. आता, पुन्हा एकदा ॲड. अमित पालेकर यांची चौकशी केली जाणार आहे. राज्यातील पोलीस यंत्रणेकडून चौकशीच्या नावाखाली सतावणूक केली जात असल्याचा आरोप ॲड अमित पालेकर यांनी यापूर्वीच केलेला आहे.
हल्लीच सिद्दिकीने आपल्या दोन व्हायरल व्हिडिओंबाबत पणजी येथे न्यायालयाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना आरोपांचा पुनरुच्चार करून काही विधाने केली होती. जुने गोवे पोलिसांकडून त्याबाबत नव्याने चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.