सार्वभौमत्वासाठी भारत वचनबद्ध

0
122

>> परराष्ट्र मंत्रालयाकडून चीनला इशारा

लडाखमधील गलवान खोर्‍यातील हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता या तत्वांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा ठणकावून सांगताना चीनला एकप्रकारे इशारा दिला आहे. भारत हा नेहमीच मतभेद हे शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत या मताचा देश आहे.

मात्र, परिस्थितीनुसार कोणत्याही कारवाईलाही आम्ही तयार आहोत. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले. आमच्या सर्व सीमांजवळील भागामध्ये शांतता आणि सौहार्दता आमचा नेहमीच प्रयत्न असल्याचे श्रीवास्तव म्हणाले.

दरम्यान, भारत आणि चीन या दोन देशांमधील संवाद अद्याप थांबलेला नाही. या संवादाचा एक भाग म्हणूनच गुरुवारी दोन्ही देशांदरम्यान मेजर जनरल स्तरावरील बैठक पार पडली.