राज्यात नवीन ४९ कोरोनाबाधित रुग्ण

0
124

>> १३ जण कोरोनामुक्त, ४ आयसोलेटेड रुग्ण

राज्यात नवीन ४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९६ वर पोहोचली आहे. मांगूर हिलमध्ये नवीन १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे कोरोना पॉझिटिव्ह १३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ७०५ झाली आहे. त्यातील कोरोना पॉझिटिव्ह १०९ रुग्ण बरे झाले आहेत. कोविड इस्पितळ आणि कोविड केअर सेंटरमध्ये ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मांगूर हिलमध्ये नवीन १९ रुग्ण
मांगूर हिलमध्ये आणखी १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. मांगूर हिलमध्ये आत्तापर्यंत ३१३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. मांगूर हिलातील या रहिवाशांची कोविड चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे.

मांगूर हिलाशी संबंधित आणखी ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मांगूर हिलाशी संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८१ वर पोहोचली आहे.

राय, कुडतरीत रुग्णसंख्येत वाढ
सासष्टी तालुक्यातील राय येथे नवीन ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रायमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली आहे. कुडतरीमध्ये नवीन २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कुडतरीतील कोरोना रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. मडगाव, बेती येथे आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६ झाली आहे.

चिंबलमध्ये नवीन ७ रुग्ण
चिंबल येथे नवीन ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. चिंबलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१ झाली आहे. चिंबल इंदिरानगर भागात आयसोलेट २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

सडा – वास्को भागात नवीन ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सडा भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ वर पोहोचली आहे.

गोमेकॉत ९ संशयित
जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित ९ रुग्णांना दाखल करण्यात आले असून या वॉर्डात कोरोना संशयित १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याने १३११ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत पाठविले. प्रयोगशाळेतून १३३३ नमुन्यांचा अहवाल जाहीर केला आहे. प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १२८४ नमुने निगेटिव्ह आहेत. ४९ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. ५४७ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

सरकारचा दावा फोल
या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मांगूर हिलाशी काहीच संबंध नाही. राज्यात केवळ मांगूर हिलामुळेच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याचा सरकारचा दावा या प्रकरणामुळे फोल ठरत आहे. मांगूर हिलाबरोबर आयसोलेट रूग्णांची संख्या वाढू लागली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरू झाला आहे. राज्यातील काही भागात कोरोना पॉझिटिव्हची आयसोलेट प्रकरणे आढळून येऊ लागली आहे. पर्वरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मांगूर हिलाशी संबंध नाही. आता, इंदिरानगर चिंबल येथे २, आंबावली चिंचिणी येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यांचा मांगूर हिलशी संबंध नाही. बेतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मांगूर हिलशी संबंध नाही. सरकारी अधिकार्‍यांकडून पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील आयसोलेट प्रकरणाबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती दिली जाते.

चिंबल, आंबावली आयसोलेटेड रुग्ण
मांगूर हिल वास्कोच्या बाहेर इंदिरानगर-चिंबल, आंबावली-चिंचिणी या ठिकाणी नवीन ३ आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पर्वरीमध्ये यापूर्वी एक आयसोलेट रूग्ण आढळून आला आहे. आरोग्य खात्याच्या दैनंदिन अहवालानुसार आत्तापर्यंत ४ आयसोलेटेड पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.