Home बातम्या सार्दिनवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्याची मागणी

सार्दिनवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्याची मागणी

0

गोव्यातील पोर्तुगीज राजवटीचे समर्थन करणारे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवावा व पुढील सहा वर्षे त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी दत्ता नाईक यानी संसद सदस्यांना पाठवलेल्या एका निवेदनातून केली आहे.

फ्रान्सिस सार्दिन यानी पोर्तुगीज राजवटीचे समर्थन केल्याचे वृत्त एका मराठी दैनिकात ६ रोजी प्रसिध्द झाले असल्याचे नाईक यानी सदर निवेदनातून म्हटले आहे.

पोर्तुगीजांची राजवट ही जुलमी, धर्मनिरपेक्षविरोधी, घटनाबाह्य, अलोकशाही वृत्तीची व क्रौर्याची परिसीमा गाठलेली अशी होती. असे असताना सदर राजवटीचे गुणगान करणार्‍या सार्दिन यांच्यावर देशद्रोहाचा खटला घालण्याची गरज असल्याचे दत्ता नाईक यांनी म्हटले आहे.