इस्त्रायली दूताच्या कारमध्ये झालेला स्फोट हा सुनियोजित दहशतवादी हल्ला होता, असे केंद्रीय गृहमंंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. परवा दुपारी झालेल्या या हल्ल्यात दूताच्या पत्नी व ड्रायव्हर गंभीर जखमी झाले होते.
काल गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांकडून याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, ही कार सिग्नलसाठी थांबली असता मागून आलेल्या मोटरसायकलस्वाराने हा चुंबकीय बॉम्ब गाडीला लावल्याचा संशय आहे. घटनेचा तपास तीव्रगतीने सुरू असल्याचे ते म्हणाले. मात्र इतक्यात कुठल्याच देशाकडे निर्देश करता येणार नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन करून तपासाबाबत आश्वस्थ केले.