सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी अपुरे मनुष्यबळ

0
87

सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. मर्यादित सुविधा असतानाही सायबर विभागाने ३४६ बनावट प्रोफाईल नष्ट केल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. रंगनाथन यांनी दिली. राजभवनचे संकेतस्थळ हॅक करणार्‍यांचाही शोध लावल्याचे सांगून, वेगवेगळ्या आस्थापनातील वाय-फायचा आधार घेऊन अनेक बनावट प्रोफाईल तयार करण्याचे प्रकार होत असतात व त्यांचा शोध घेणे कठीण होते, असे त्यांनी सांगितले.
सायबर विभागाला एका मुलीच्या नावाने केलेल्या बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करून पैसे उकळविणारा १५ वर्षाचा बालकही सापडल्याची माहिती त्यांनी दिली.
त्याचप्रमाणे काही मुलांच्या नावाने वेगवेगळे बनावट १५ प्रोफाईल तयार करून निष्पाप मुलींची प्रतिमा खराब करणार्‍या एका युवतीलाही अटक केल्याचे रंगनाथन यांनी सांगितले.