साबांखातील कथित गैरव्यवहार प्रकरणी अभ्यासाअंती कारवाई

0
59

>> मुख्यमंत्र्यांचा सुदिन ढवळीकरांना इशारा

सार्वजनिक बांधकाम खात्यातील गैरप्रकाराविरुध्द अनेक तक्रारी आलेल्या असून त्या अभ्यासल्यानंतरच कारवाईच्या बाबतीत निर्णय घेणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सांगितले. मगोच्या आमदारांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी साबांखातील गैरव्यवहाराची सरकारने चौकशी करावी म्हणून सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. ताळगावचे भाजपचे गटाध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी उघडपणे ढवळीकर यांच्यावर आरोप केले होते.
निर्णय योग्यच : प्रमोद सावंत
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मगो पक्षाच्या दोन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय योग्यच होता. सरकारात राहून सरकारवर चिखलफेक करणार्‍यांना व युतीचा धर्म तोडणार्‍यांना शिक्षा करण्यावाचून गत्यंतर नव्हते. युती तुटली तरी भाजपवर त्याचा कोणताच परिणाम होणार नाही. साखळी मतदारसंघातून भाजप उमेदवार विकासकामांच्या जोरावर प्रचंड मतांनी निवडून येईल असा दावा त्यांनी केला.
मगो मंत्र्यांना डच्चू दिल्याने त्यांनी सरकारचा पाठींबा काढून
घेतला तरी सरकारवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.
भाजपाकडे २१ आमदारांचे संख्याबळ आहे. तसेच इतर पाच आमदारांचाही सरकारला पाठींबा आहे. येत्या निवडणुकीतही युती शिवाय भाजप २६ जागांवर स्वबळावर निवडून येईल, असा दावा त्यांनी केला.