माविन गुदिन्हो यांचा उद्या भाजपात प्रवेश

0
64

कॉंग्रेसचे आमदार माविन गुदिन्हो यांनी आपण उद्या शुक्रवार दि. १६ रोजी कॉंग्रेस पक्षाचा राजिनामा देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

तसेच आपण भाजपच्या तिकिटावर दाबोळी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहे असेही त्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वा. पणजीतील कॉंग्रेस भवनात कॉंग्रेसचा राजिनामा सादर करून संध्या. ४.३० वा. भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भाजप प्रवेशानंतर दाबोळी मतदारसंघात रॅली काढणार असल्याचेही ते म्हणाले.