सहारनपूर हिंसाचारास भाजप जबाबदार : मायावती

0
81

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील ताज्या जातीय हिंसाचाराला सत्ताधारी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप काल बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला. याआधी भाजपाने मायावती यांच्यावर या हिंसाचाराबद्दल ठपका ठेवला होता.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची जातीय विचारसरणी सामाजिक सलोखा धोक्यात आणीत असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. दरम्यान माकपनेही या हिंसाचाराचा निषेध केला आहे. मायावतींच्या रॅलीनंतर उफाळलेल्या हिंसाचाराला हिंदू युवा वाहिनी जबाबदार असल्याचे माकपने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे एकमंत्री श्रीकांत शर्मा यांनी मायावतींवर हिंसाचाराबाबत ठपका ठेवला होता. सहारनपूरमध्ये शांतता निर्माण झाली होती. मात्र मायावती तेथे गेल्या आणि हिंसाचार पुन्हा उफाळला असा आरोप त्यांनी केला. दोषींवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.