सहप्रवाशास हेल्मेट सक्ती बारगळल्यात जमा

0
99

हेल्मेटच्या विषयावर राज्यातील मोटरसायकल पायलटांचा प्रश्‍न सोडविणे शक्य होत नसल्याने दुचाकीवरील सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बारगळल्यात जमा आहे.सध्या दुचाकीवरील सहप्रवाशांना हेल्मेट न वापरल्याच्या कारणावरून कुठेही चलन दिलेले दिसत नाही. वाहतूक पोलिसांना प्रत्यक्षात ते शक्यही नाही तसेच दुचाकीवरील सहप्रवाशाला हेल्मेट सांभाळणेही कठीण आहे. वाहतूक खात्याने कारवाईचे कितीही इशारे दिले तरी मोटर सायकल पायलटचा प्रश्‍न सोडविल्याशिवाय सरकारने सहप्रवाशाला दंड घालणे शक्यच नाही. मोटरसायकलवाल्यांना वेगळा व अन्य लोकांना वेगळा कायदा असूच शकत नाही. मोटरसायकलवाल्यांना हेल्मेटच्या बाबतीत सवलत दिल्यास कोणीही त्यास न्यायालयात आव्हान देऊ शकेल. त्यामुळे या विषयावर सरकारला सौम्य धोरण अवलंबिण्यापासून अन्य पर्याय राहिलेला नाही, अशी चर्चा आहे. राज्यात सुमारे पाच हजार मोटरसायकल पायलट आहेत.