बालक हक्क संरक्षण आयोग अध्यक्षपद भरती प्रक्रिया सुरू

0
110

गोवा राज्य बालक हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्षपद भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून बाल हक्क संरक्षण कायद्यातील कलम १७ नुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून महिला आणि बाल विकास खात्याने अर्ज मागविले आहेत.वरीलपद तीन वर्षांच्या काळासाठी आहे. महिला आणि बाल विकास खात्याच्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र उमेदवाराची निवड करतील, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली. बालक कायद्याच्या बाबतीत जागृती करणे बालकांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच बालकांवर केल्या जाणार्‍या अत्याचारांची दखल घेऊन उपाय शोधणे हे या आयोगाचे महत्त्वाचे काम असते.