सलमानच्या घरासमोर निदर्शने

0
62

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने श्रीलंकेत जाऊन श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा प्रचार केल्याच्या निषेधार्त तमिळ संघटनांनी काल सलमान खानच्या घरासमोर निदर्शने केली. महेंद्रा राजपक्षे यांचा प्रचार केल्याने या संघटना संतापल्या आहेत. कोलंबोत सलमान खानने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह राजपक्षे यांचा प्रचार केला होता. सलमान खानच्या ‘बिईंग ह्युमन फाउंडेशनने’ सत्ताधारी पक्षाच्या सहकार्याने श्रीलंकेत डोळे तपासणी शिबिर आयोजित केले होते.