भू-संपादन दुरुस्तीविरोधात ‘आप’चे आज विरोध प्रदर्शन

0
76

भू-संपादन कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीच्या विरोधात आम आदमी पक्ष आज देशभरात विरोध प्रदर्शन करणार आहे. पक्षाच्या गोवा विभागातर्फे पणजी येथील आझाद मैदानावर सकाळी १०.३० वाजता कार्यकर्ते जमणार असून नंतर उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. मडगाव येथील दक्षिण गोव जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता विरोध प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे आप गोवाचे वाल्मिकी नाईक नाईक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सरकारने हा निर्णय घाईगडबडीत घेतल्याचे आपचे म्हणणे आहे.