‘त्या’ शिक्षकाला  इस्पितळात दाखल

0
84

वास्कोतील शाळकरी मुलीच्या विनयभंग प्रकरणी अटक केलेल्या शिक्षकास काल अस्वस्थ वाटू लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. वास्को परिसरातील एका नामांकित मुलींच्या शाळेतील एका आठ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी अटक केलेल्या ‘त्या’ शिक्षकाला काल अचानक छातीत कळ येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने बांबोळी येथे गोवा मेडीकल कॉलेजमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला उपचारासाठी इस्पितळात पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. उद्या डिसचार्ज दिल्यास सदर शिक्षकाला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.