सर्व सरकारी दाखल्यांसाठी मोङ्गत ऑनलाईन सुविधा

0
86

>> मुख्यमंत्र्यांहस्ते संकेत स्थळाचे उद्घाटन

सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने निवासी दाखला, डायवर्जन्स दाखला, वास्तव्याचा दाखला, जमिनीचे विभाजन, जातीचा दाखला, उत्पन्न, ध्वनी परवाना, एक चौदाचा उतारा, जमीन रुपांतर दाखला, नैसर्गिक आपत्ती अर्ज या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असून www.goaonline.gov.in या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वरील ऑनलाईन सुविधा मोङ्गत उपलब्ध होणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल मंत्री रोहन खवटे उपस्थित होते. पुढील तीन ते सहा महिन्यात वरील प्रकारच्या अन्य सेवाही ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातील. वरील सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी पंधरा दिवस लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी माहिती देताना सांगितले.
सरकारच्या या निर्णयामुळे संबंधितांना कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. एका छताखाली या सेवा देण्याच्या योजनेमुळे नागरिकांची चांगली सोय होईल. या सेवांसाठी नागरिकांनी वरील संकेतस्थळावर आपला प्रोफाईल तयार करून ठेवावा. ही योजना आधार व भ्रमणध्वनी क्रमांकाला जोडण्यात आल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. जलद सेवा देण्याच्या हेतूनेच वरील योजना राबवल्याचे ते म्हणाले. ऑनलाईन पद्धतीने आवश्यक ती माहिती जोडावी लागेल, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.