मध्ये आजपासून चित्रपट महोत्सव

0
91

>> राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ३८ चित्रपटांचा समावेश

डेल (‘पिंक’ ङ्गेम) कीर्ती कुल्हारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि. १८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयनॉक्स (स्क्रीन १) येथे या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात १३ भाषांतील ३८ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. काल बुधवारी पत्रकार परिषदेत गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी या महोत्सवाचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी महोत्सवाचे समन्वयक सचिन चाटे, चित्रपट निर्माता धर्मानंद वेर्णेकर व संदीप कुंडईकर उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याला ‘पिंक’चे पटकथा लेखक रितेश शहा तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त निर्माता-दिग्दर्शक राजेश म्हापूसकर, निखिल मंजू, आदित्य जांभळे, कौशिक गांगुली, सुनील सुखठनकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
श्री. तालक यांनी सांगितले, की हा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे गोमंतकीय निर्माता व दिग्दर्शकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यात ‘के सेरा सेरा’चे निर्माता राजेश पेडणेकर व गायत्री पेडणेकर, दिग्दर्शक राजीव शिंदे, ‘आबा ऐकताय ना’चे दिग्दर्शक आदित्य जांभळे, ‘एनिमी’चे निर्माता अल्लापार्थी दुर्गाप्रसाद व दिग्दर्शक दिनेश भोसले, ‘नाचुया कुंपासार’चे दिग्दर्शक बारद्रॉय बार्रेटो, ‘बागा बीच’च्या निर्माता डॉ. (सौ.) प्रमोद साळगावकर व दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर यांचा समावेश आहे.
उद्घाटनानंतर ‘आबा ऐकताय ना?’ व ‘कासव’ हे दोन मराठी चित्रपट आयनॉक्समध्ये दाखविले जातील. उद्घाटनाचा सोहळा मॅकेनिझ पॅलेस थिएटरमध्ये स्क्रीनवर दाखवण्याची सोयही करण्यात आली आहे.