सरन्यायाधीश चंद्रचूड शनिवारी गोव्यात येणार

0
6

मेरशी येथे महामार्गाच्याजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी उत्तर गोवा जिल्ह्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालये आणि त्यांच्या कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याऐवजी, शनिवार दि. 9 नोव्हेंबर हा दिवस कामकाजाचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.