Home बातम्या सभापतींविरोधात विशेषाधिकारभंग नोटीस

सभापतींविरोधात विशेषाधिकारभंग नोटीस

0

गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर यांच्याविरोधात सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे.

आमदार वीरेश बोरकर यांनी गोवा विधानसभेच्या सचिवांकडे ही नोटीस सादर केली आहे. गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील 16 मार्चच्या विधानसभा कामकाजासंदर्भात सभापती डॉ. गणेश गावकर यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस बोरकर यांनी दिली आहे. सभापतींनी नियमांची अयोग्य अंमलबजावणी, चर्चेविना महत्त्वाचे कामकाज मंजूर केल्याचा आरोप बोरकर यांनी केला आहे. विधानसभेच्या विशेषाधिकार समितीने या प्रकरणात चौकशी करावी, अशी मागणी बोरकर यांनी केली आहे.