Home बातम्या सभापतिपदाच्या उमेदवाराची लवकरच घोषणा : मुख्यमंत्री

सभापतिपदाच्या उमेदवाराची लवकरच घोषणा : मुख्यमंत्री

0

गोवा विधानसभेच्या सभापतिपदासाठी सत्ताधारी गटाच्या उमेदवाराचे नाव लवकरच निश्चित केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
भाजपने अजूनपर्यंत सभापतिपदासाठी उमेदवारांचे नाव निश्चित केलेले नाही. या पदासाठी योग्य उमेदवाराची लवकरच घोषणा केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोवा विधानसभेच्या नव्या सभापतींची निवड करण्यासाठी 25 सप्टेंबरला खास अधिवेशन घेतले जाणार आहे. भाजपमध्ये सभापतिपदासाठी अनेकांच्या नावांवर चर्चा सुरू आहे.

कृष्णा साळकरांचेही नाव चर्चेत

आमदार गणेश गावकर यांच्याबरोबर आता वास्को मतदारसंघातून आमदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेल्या कृष्णा साळकर यांच्या नावाचीही सभापतिपदासाठी चर्चा आहे.

गणेश गावकर यांचे नाव सभापतीपदासाठी सुरवातीपासूनच चर्चेत आहे. गणेश गावकर हे स्वत: या पदासाठी खूप उत्सूक असून, दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या गणेश गावकर यांनी सरकारने आपणाला हे पद दिल्यास आपण त्या पदाला न्याय देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला, कृष्णा साळकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे याबाबत योग्य असाच निर्णय घेतील, असे म्हटले आहे.