Home बातम्या संसदेतील सहा विधेयकांना भाजपकडून अडथळा

संसदेतील सहा विधेयकांना भाजपकडून अडथळा

0
वरील सहा विधेयके ही आपल्या सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनांच्या रचनेचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे ते म्हणाले. ‘या विधेयकांविरोधात कोण उभे आहे? आम्हाला ती संमत करायची आहेत. ती कोण अडवू पाहत आहे? भाजप ती अडवू पाहत आहे. ते संसदेचे कामकाज चालवू देत नाहीत’, असे राहुल यावेळी म्हणाले.
‘आज संसदेत सहा लाचविरोधी विधेयके प्रलंबित आहेत.

ही विधेयके तुमच्यासाठी सहायक आहेत. ही विधेयके तुम्हाला अधिकार देणारी आहेत’, असे सांगून भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. युपीए सरकारवर हल्ला चढविण्यासाठी भ्रष्टाचार हेच भाजपने आपले शस्त्र केले असल्याचा दावा त्यांनी केला. ते (भाजप) केवळ विकासाच्या बाताच करतात. आम्ही आरटीआय सारखा कायदा आणून लोकांच्या हातात अधिकार दिला’ असा दावा त्यांनी केला. लोकपाल विधेयकही कॉंग्रेसनेच आणले याकडे त्यांनी लक्ष वेधले.