सध्या देशभारत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे; पण या निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 19 दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 15 बैठका होणार आहेत.