दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ नागरी विमान वाहतुकीसाठी सुरू राहील, अशी ग्वाही केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला नवी दिल्लीत दिली.
गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दाबोळी विमानतळ नागरी विमान वाहतुकीसाठी खुला राहिले, असे आश्वासन दिले होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नवी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर दाबोळी विमानतळावरील नागरी विमान वाहतुकीचा विषय मांडला. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो, माजी मंत्री, आमदार नीलेश काब्राल यांनी उपस्थिती होती.