Home बातम्या झोपड्या, शॅक्सना अग्निशामक दलाचावैध ना हरकत दाखला सक्तीचा

झोपड्या, शॅक्सना अग्निशामक दलाचावैध ना हरकत दाखला सक्तीचा

0

गोवा पर्यटन खात्याने राज्यातील नव्याने नोंदणी केली जाणारी तसेच जुनी हॉटेल्स, जलक्रीडा, तात्पुरती हट्स (झोपड्या) तसेच शॅक्स, होम स्टे यांना अग्निशामक दलाचा वैध ना हरकत दाखला सक्तीचा केला आहे. त्यासंबंधीची अधिसूचना काल पर्यटन खात्याने काढली.
या व्यतिरिक्त निवासी इमारती, घरे, बंगले ज्यांचा पर्यटनविषयक व्यावसायासाठी उपयोग केला जाणार आहे त्यांना संबंधीत गृहसोसायटी, निवासी कल्याण संघटना, गृहमालक संघटना, यांच्याकडून दाखला मिळवावा लागेल. त्यासाठी विविध दाखले सादर करावे लागणार आहेत.
हडफडे अग्निकांडानंतर सरकारने स्थापन केलेल्या संयुक्त अमलबजावणी व देखरेख समिती वाढीव हक्क देण्यात आलेले असून अग्निसुरक्षा व अन्य नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटनविषयक व्यावसायिक आस्थापनांना सील ठोकण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आस्थापनातील माल बाहेर काढण्यासाठी सील केलेली दुकाने अल्पकाळासाठी उघडून देण्यात येतील. मात्र, अंतिम सील काढण्याचा अधिकार हा फक्त अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना असेल.