Home बातम्या संभाजी भिडे गुरुजींशी साधलामुख्यमंत्र्यांनी साखळीत संवाद

संभाजी भिडे गुरुजींशी साधलामुख्यमंत्र्यांनी साखळीत संवाद

0

रवींद्र भवनमध्ये विविध विषयांवर चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रविवारी साखळी येथे संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेतली व त्यांच्याशी मुक्त संवाद साधला. या प्रसंगी भिडे गुरूजींनी विचारप्रवर्तक संवाद साधत मार्गदर्शन केले असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

संभाजी भिडे गुरुजी यांनी देव, देश, धर्म तसेच शारीरिक तंदुरुस्ती या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्श विचारधारेतून प्रेरणा घेऊन युवकांनी शिस्तबद्ध जीवन जगावे, असे त्यांनी आवाहन केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
देशभक्ती, शिस्त, चारित्र्य निर्माण आणि सांस्कृतिक अभिमान या मूल्यांची जोपासना करण्यासाठी सांभाजी भिडे गुरुजी सातत्याने युवकांना प्रेरणा देत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

त्यांच्या विचारांमुळे तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होत असून भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होत आहे असे सांगून, या संवादातून युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कारांची जाणीव अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे या भेटीनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. या शिवाय अन्य विविध विषयांवर भिडे गुरुजींशी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.