Home बातम्या राजस्थानात इमारतकोसळली, 2 ठार

राजस्थानात इमारतकोसळली, 2 ठार

0

राजस्थानमधील कोटा शहरात शनिवारी रात्री इंदिरा विहार परिसरात एक तीन मजली इमारत अचानक कोसळून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते, तेव्हा अचानक मोठ्या आवाजासह ही तीन मजली इमारत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता असल्याने रात्रभर आणि दुसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. एकूण 15 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले, त्यापैकी 13 जण जखमी झाले होते. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.