संपकरी जीवरक्षकांना पुन्हा कामावर येण्यास ८ दिवसांची मुदत : आजगावकर

0
122

राज्यातील समुद्र किनार्‍यांवर मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे लोक बुडण्याचे प्रकार घडत आहेत. दृष्टी कंपनीला अधिकाधिक कर्मचार्‍यांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे. दृष्टी कंपनीने जादा जीवरक्षकांची नियुक्तीचे आश्‍वासन दिले आहे. या आश्‍वासनाचे पालन न केल्यास कंपनीचा करार रद्द केला जाऊ शकतो, असे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. संपावरील जीवरक्षकांना पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती ’ंत्री आजगावकर यांनी दिली.

सरकार जीवरक्षकांना सेवते सामावून घेऊ शकत नाही. मात्र, त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, असे मंत्री आजगांवकर यांनी सांगितले. दृष्टी या जीवरक्षक कंपनीकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे अनेक समुद्र किनार्‍यांवर जीवरक्षक उपलब्ध नसल्याने समुद्रात बुडून मरणार्‍याची संख्या वाढत असल्याचे मंत्री आजगावकर यांनी मान्य केले.

जीवरक्षकांचा विषय
क्षुल्लक : सोपटे
दृष्टी जीवरक्षकांचा विषय हा केवळ क्षुल्लक विषय आहे. जीवरक्षक गेले ३० दिवस आंदोलन करीत आहेत. परंतु, आत्तापर्यंत एकदाही आपला विषय घेऊन ते माझ्याकडे आले नाहीत. जीवरक्षकांनी आपला विषय घेऊन संपर्क साधला असता तर, तोडग्यासाठी आवश्यक प्रयत्न केला असता असे आमदार दयानंद सोपटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.