वीज दरात कपात करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या खासदार संजय निरूपम यांनी काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.
वीज दर कपातीबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगून निरूपम यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले होते. त्यानुसार काल निरूपम यांनी उपोषण मागे घेतले.