श्रीलंका पाचशेपार

0
80
Sri Lanka's Kusal Mendis (L) celebrates with teammate Dhananjaya de Silva (R) after scoring a century (100 runs) during the third day of the first cricket Test between Bangladesh and Sri Lanka at Zahur Ahmed Chowdhury Stadium in Chittagong on February 2, 2018. / AFP PHOTO / MUNIR UZ ZAMAN

>> कुशल, धनंजयची द्विशतके हुकली; कसोटी सामना अनिर्णिततेकडे

बांगलादेश व श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशीदेखील फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. पाटा खेळपट्टीवर बांगलादेशच्या एककल्ली मार्‍याचा फायदा उठवत श्रीलंकेने दिवसअखेर ३ बाद ५०४ धावा केल्या आहेत. बांगलादेशने पहिल्या डावात ५१३ धावांचा डोंगर उभारला होता. लंकेचा संघ केवळ ९ धावांनी पिछाडीवर असून सामन्याचे दोन दिवस शिल्लक आहेत.

दुसर्‍या दिवसाच्या १ बाद १८७ धावांवरून काल पुढे खेळताना कुशल-धनंजय जोडीने बांगलादेशी गोलंदाजांना यशापासून दूरच ठेवले. या द्वयीने दुसर्‍या गड्यासाठी तब्बल ३०८ धावांची भागीदारी रचली. मुस्तफिझुरचा चेंडू पूल करण्याच्या नादात धनंजय दुसर्‍या गड्याच्या रुपात बाद झाला. त्याने २२९ चेंडूंचा सामना करताना २१ चौकार व १ षटकारासह १७३ धावांची खेळी केली. धनंजयच्या पतनानंतरही लंकेने वर्चस्व कायम राखले. कुशलने यानंतर रोशन सिल्वासह तिसर्‍या गड्यासाठी १०७ धावा जोडल्या. द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना कुशल वैयक्तिक १९६ धावांवर बाद झाला. त्याने या दरम्यान आपली यापूर्वीची १९४ ही वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या मागे टाकली. दिवसअखेर रोशन सिल्वा ८७ व कर्णदार दिनेश चंदीमल ३७ धावांवर नाबाद होते. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८९ धावांची अविभक्त भागीदारी केली आहे.

धावफलक
बांगलादेश पहिला डाव ः सर्वबाद ५१३
श्रीलंका पहिला डाव ः (१ बाद १८७ वरून) ः कुशल मेंडीस झे. रहीम गो. ताईजुल १९६, धनंजय डीसिल्वा झे. दास गो. मुस्तफिझुर १७३, रोशन सिल्वा नाबाद ८७, दिनेश चंदीमल नाबाद ३७, अवांतर ११, एकूण १३८ षटकांत ३ बाद ५०४
गोलंदाजी ः मुस्तफिझुर रहमान २५-५-८८-१, सुन्झामुल इस्लाम ३७-२-१२८-०, मेहदी मिराझ १९-०-९७-१, ताईजुल इस्लाम ५१-१३-१४४-१, मोसद्देक हुसेन ३-०-२४-०, मोमिनूल हक २-०-६-०, महमुदुल्ला १-०-७-०