श्रीपाद नाईक दिल्लीला रवाना

0
61

>> अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक उत्तर कर्नाटकात त्यांच्या कारगाडीला झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर प्रथमच नवी दिल्लीला काल रवाना झाले आहेत.
केंद्रीय मंत्री नाईक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

उत्तर कर्नाटकात ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात केंद्रीय मंत्री नाईक गंभीर जखमी झाले. तर, त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचे निधन झाले. उत्तर कर्नाटकातील अपघातात जखमी झालेल्या केंद्रीय मंत्री नाईक यांच्यावर गोमेकॉमध्ये ४४ दिवस उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना २४ फेब्रुवारी २०२१ ला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर नाईक यांनी आडपई येथील मूळ घरी विश्रांती घेतली. श्रीपाद नाईक यांनी नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी १३ मार्चला बांबोळी येथील गोमेकॉमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली