श्रीनिवासच्या जागी प्रथमेशला संधी

0
79

अंडर-२३ खेळाडू प्रथमेश गावसला विदर्भविरुद्ध आजपासून पर्वरी क्रिकेट मैदानावर सुरु होणार्‍या रणजी चषक सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
श्रीनिवास फडते हा सराव करताना जखमी झाल्याने त्याच्या जागी प्रथमेशला संधी देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरविरुद्ध आजपासून सुरू होणार्‍या सी. के. नायडू अंडर-२३ संघात प्रथमेश गावसची निवड झाली होती. परंतु श्रीनिवास दुखापतग्रस्त बनल्याने आता त्याला रणजी संघात बढती मिळाली आहे.