शेतात सांडपाणी सोडल्याने बांधकाम खात्याला दंड

0
59

फातोर्डा येथील शेतात सांडपाणी सोडल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने १ कोटी १८ लाखांचा दंड ठोठावला आहे. बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांना दंडाची रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली आहे. एनजीटीच्या आदेशानुसार दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाच्या रक्कमेचा सांडपाणई सोडण्यात आलेल्या भागातील साफसफाईच्या कामासाठी वापर केला जाणार आहे, असे म्हटले आहे.