शहबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान

0
29

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी काल पाकिस्तानच्या
पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते पाकचे २३ वे पंतप्रधान ठरले आहेतं
इम्रान खान यांना अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आल्यानंतर आता शहबाज शरीफ हे पाकचे नवे पंतप्रधान बनले आहेत. तत्पूर्वी, पाकच्या संसदेत काल मतदान झाले. पीटीआयच्या सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे शरीफ हे पंतप्रधान म्हणून बिनविरोध निवडून आले.