कार्तिक कुडणेकरांकडून अध्यक्षपदाचा राजीनामा

0
14

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपचे वर्चस्व असून, आता जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिध्देश नाईक यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली. त्यानुसार, अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असे कुडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने सिध्देश नाईक यांनी बंडाचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सिध्देश नाईक यांची समजूत काढण्यात यश आले होते.