शरद पवार यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे

0
6

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतला असून, तेच अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाहणार आहेत, अशी घोषणाच त्यांनी काल वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. जनतेचे प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहून कार्य करत राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती समिती केली. त्यानंतर काल पवारांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली.

मी सर्व जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी इच्छा होती. मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसांत तीव्र भावना निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, माझे सहकारी अस्वस्थ झाले होते. मी या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी माझे हितचिंतक, कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी एकमुखाने मागणी केली होती, असे पवार म्हणाले.