शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

0
78

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद पवार यांच्यावर आज बुधवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. काल त्यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
रविवारी रात्री शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले होते.