सलग सातव्या दिवशी १००पेक्षा अधिक कोरोनाबाधित

0
85

>> मंगळवारी १२७ पॉझिटिव्ह, १ मृत्यू

राज्यात सलग सातव्या दिवशी शंभरपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चोवीस तासांत नवे १२७ बाधित रुग्ण आढळून आले असून आणखी एका रुग्णाचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या १४१९ एवढी झाली असून कोरोना बळींची एकूण संख्या ८२९ एवढी झाली आहे.

पणजी, मडगाव, फोंडा, वास्को, पर्वरी, कांदोळी, म्हापसा या भागात मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळून येत आहेत. गोमेकॉमध्ये मुरगाव येथील ७२ वर्षीय महिला रुग्णाचे निधन झाले. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ८३९ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आणखी १३६ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ५५ हजार ५९१ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.११ टक्के एवढे आहे.

कोरोना पॉझिटिव्ह नवीन १५९ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.
इस्पितळात नवीन ३७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. चोवीस तासांत १५०४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ८.४४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पणजीत नवे १८ रुग्ण
राजधानी पणजी आणि मडगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेत नवे १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पणजीतील सध्याची रुग्णसंख्या १५७ झाली आहे. तर, मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १६७ झाली आहे. फोंड्यात १०७ रुग्ण, पर्वरीत ११८ रुग्ण, कांदोळीत १०७ रुग्ण, वास्कोत ९० रुग्ण आणि म्हापशात ८६ रुग्ण ्‌आहेत.

चिंबल आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. कासावली ६१ रुग्ण , कुठ्ठाळीत ६९ रुग्ण, चिंचिणी ४० रुग्ण, शिवोली ५३ रुग्ण, साखळी २९ रुग्ण, नावेली २५ रुग्ण, लोटली २४ रुग्ण, हळदोणा ३२ रुग्ण, खोर्ली २३ रुग्ण, डिचोली २२ रुग्ण आहेत. तसेच, सहा प्रवासी कोरोनाबाधित झाले आहेत.