राज्य सरकारने जमीन हडप प्रकरणी नियुक्त केलेल्या एक सदस्यीय आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. जाधव (उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश) गुरुवार दि. २७ ऑक्टोबर रोजी पदाचा ताबा स्वीकारणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काल दिली. राज्यातील जमीन हडप प्रकरणी एसआयटीकडून तपास सुरू आहे. सरकारने या प्रकरणी एक सदस्यीय आयोगाची स्थापनेची घोषणा ऑगस्ट महिन्यात केली. या आयोगाच्या कामकाजाबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.
राज्यात एसआयटीने जमीन हडप प्रकरणी अनेक गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात वीसच्या आसपास संशयितांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली आहे. जमीन हडप प्रकरणात काही सरकारी अधिकारी व कर्मचार्यांना अटक करण्यात आली आहे. त्यात बार्देश तत्कालीन मामलेदार राहुल देसाई यांचा ही सहभाग आहे.