सरकार दरबारी नोंदणी न करता बेकायदेशीररित्या राज्यात पर्यटनविषयक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांनी येत्या 15 सप्टेंबरपूर्वी नोंदणी करावी, अशी जाहीर सूचना पर्यटन खात्याने केली आहे. यानंतरही बेकायदा व्यवसाय चालू असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.राज्यातील कित्येक हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस, होम स्टे, टुरिस्ट गाईड्स, जलक्रीडा आयोजक, खासगी शॅक्स, ट्रॅव्हल, एजंट्स, फोटोग्राफर्स, स्पाईस प्लांटेशन्स, ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हाडर्स, साहसी क्रीडा आयोजक आदींनी गोवा पर्यटन व्यापार कायद्याखाली सरकार दरबारी नोंदणी केली नसल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर सरकारने बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या अशा व्यावसायिकांना येत्या 15 सप्टेंबरपर्यंत सरकार दरबारी नोंदणी करावी, अशी जाहीर सूचना केली आहे. सरकार दरबारी नोंदणी न करता 15 सप्टेंबरनंतर जे कोण अशा प्रकारे बेकायदेशीररित्या व्यवसाय करीत असल्याचे आढळून येतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पर्यटन खात्याने जाहीर नोटिसीद्वारे स्पष्ट केले आहे.