Home बातम्या विरोधकांच्या आघाडीत बिघाडी; आरजीपी बाहेर

विरोधकांच्या आघाडीत बिघाडी; आरजीपी बाहेर

0

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस व गोवा फॉरवर्ड या दोन विरोधी पक्षांच्या आघाडीत सहभागी न होण्याचा निर्णय रिव्होल्युशनरी गोवन्सने घेतल्याने वरील आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने दिलेला नवा प्रस्ताव धडकावून लावत आरजीपीने काल ‘एकला चलो रे’चा मार्ग अवलंबिला. आरजीपीने नवा प्रस्तावही फेटाळल्याचे काल काँग्रेसने स्पष्ट केले.