जिल्हा पंचायत निवडणूक
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार दि. 9 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी काल 132 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आत्तापर्यंत 208 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी येत्या दि. 20 डिसेंबर रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. गेल्या 1 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. 9 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक ही पक्षीय पातळीवर घेतली जात आहे. भाजप, काँग्रेस, मगोप, आरजीपी, आप या राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. तसेच अनेकांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही अर्ज भरले आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांकडून 10 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी सुरू केली जाणार असून, 11 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात.