विराट कोहलीचे चौथे शतक

0
80

>>बंगळुरूची पंजाबवर ‘ डकवर्थ लुइस’ पद्धतीत ८२ धावांनी मात

कर्णधार विराट कोहलीच्या विद्यमान आयपीएलमधील चौथ्या शतकाच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ‘ डकवर्थ लुइस’ पद्धतीत ८२ धावांनी विजय मिळवीत ‘प्ले ऑफस’चे आव्हान जिवंत राखले.
चिन्नास्वामी स्टेडियमवरील या पावसाच्या अडथळ्यातील सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजीत १५ षटकात ३ बाद २११ धावा केल्या आणि नंतर किंग्ज इलेव्हनला १४ षटकात ९ बाद १२०धावांवर रोखलेे. एक षटक बाकी असताना पुन्हा पाऊस सुरू झाल्याने बंगळुरूला ‘ डकवर्थ लुइस’ पद्धतीत ८२ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. पंजाबतर्फे केवळ वृध्दिमान साहानेच (२४) विशी ओलांडली. या विजयासह बंगळुरूने १३ सामन्यातून १४ गुण जमवीत तिसर्‍या क्रमावर झेप घेतली.
तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीच्या चौथ्या आयपीएल शतकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजीत ३ बाद २११ धावांचा पर्वत रचला. प्रथम फलंदाजीस पाचारण केलेल्या यजमानांना तुफानी प्रारंभ करून देताना सलामीवीर ख्रिस गेल (३२ चेंडूत ४ चौकार, ८ षटकारासह ७३) आणि कर्णधार कोहलीने (५८ चेंडूत १२ चौकार आणि ८ षटकारासह ११३) पंजाबची गोलंदाजी अक्षरशः: झोडपीत केवळ ११ षटकात १४७ धावांची सलामी दिली. अकराव्या षटकात पटेलने ही जोडी फोडताना गेलला मिलरकरवी झेलबाद केले. नंतर आलेला डिविलियर्स ऍबोटच्या गोलंदाजीवर विलक्षण फटका लगावण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचित झाला. कोहलीही आपले चौथे शतक नोंदल्यावर शर्माच्या गोलंदाजीवर मिलकरवी झेलबाद झाला.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १५ षटकात ३ बाद २११ (ख्रिस गेल ७३, विराट कोहली ११३, एबी डिविलियर्स ०, के. एल. राहुल नाबाद १६, शेन वॉटसन नाबाद १, अवांतर ८, एकूण १५ षटकात ३ बाद २११. संदीप शर्मा १/२९, कायल ऍबोट १/४८, अक्षर पटेल १/४६ बळी). वि. वि. किंग्ज इलेव्हन पंजाब १४ षटकात ९ बाद १२० (मुरली विजय १६, हासिम आमला ९, वृध्दिमान साहा २४, डेविड मिलर ३, गुरकिरत सिंग १८, अक्षर पटेल १३, बेहरादिन ०, ऍबोट ०, मोहित शर्मा १४, करियप्पा नाबाद १२, संदीप शर्मा नाबाद ५ धावा. अरविंद २/१८, यजुर्वेंद्र चहल ४/२५, शेन वॉटसन २/७ बळी).