विराट कसोटीत नंबर १

0
97

इंग्लंडविरुद्धच्या पहिला कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी कर्णधार विराट कोहलीला मात्र या लढतीच्या दोन्ही धावात केलेल्या दमदार फलंदाजीचा फायदा झाला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला खाली खेचत आयसीसीच्या कसोटी जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविले आहे. कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळविणारा विराट हा भारताचा सातवा फलंदाज ठरला आाहे.

यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, सुनिल गावसकर, विरेंद्र सेहवाग आणि दिलीप वेंगसरकर या सहा दिग्गजांनी कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळविले होते. आता त्यांच्या नंतर विराटने हा पराक्रम केला आहेेे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ ३१ धावांनी पराभूत झाला. परंतु या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकतर्फी झुंज देताना पहिल्या डावात १४९ धावांची खेळी करताना आपल्या कारकिर्दीतील २०वे शतक नोंंदविले. तर दुसर्‍या डावात ५१ धावांची अर्धशतकी खेळी करीत ९३४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. दुसर्‍या स्थानी घसरण झालेल्या ऑस्टे्रेलियन कर्णधार स्मिथचे ९२९ गुण आहेत. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुट ८६५ गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे.
विराट व्यतिरिक्त चेतेश्वर पुजाराने (७९१) या अन्य एकमेव भारतीय फलंदाजाने अव्वल दहात स्थान मिळविलेले आहे. पुजारा सहाव्या स्थानी आहे.