विधिकार दिनासाठी उपराष्ट्रपतींना निमंत्रण

0
124

गोवा विधानसभेच्या येत्या ९ जानेवारी २०२१ रोजी आयोजित विधिकार दिन कार्यक्रमाला देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना निमंत्रित करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी उपराष्ट्रपती नायडू यांना निमंत्रित केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.