विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आज बैठक

0
87

येत्या दि. २३ पासून होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज निश्‍चित करण्यासाठी आज विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून राज्याचा अर्थसंकल्प दि. २५ किंवा २६ रोजी होण्याची शक्यता आहे. यंदाचा अर्थसंकल्प रोजगाराच्या संधी निर्माण करणारा असेल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अधिकार्‍यांच्या बैठका चालूच आहेत.