वास्कोत इमारतीचा स्लॅब कोसळूून नऊजण जखमी

0
86

वास्को येथील स्वातंत्र्यपथ मार्गावरील ऍक्सीस बँकेच्या बाजूला असलेल्या हॅप्पी अपार्टमेंट इमारतीमधील तिसर्‍या मजल्यावरील एका खोलीचा स्लॅब कोसळून दुसर्‍या मजल्यावरील ९ जण जखमी झाले. त्यांना त्वरित चिखलीतील सरकारी रुग्णालयात उपचार करून बांबोळी गोमेकॉत पाठवण्यात आले. दरम्यान, या इमारतीतील सर्व रहिवाशांना ही इमारत खाली करण्यास सांगण्यात आले आहे.

ही इमारत तीस वर्षांपूर्वीची असून मुरगाव पालिकेने असुरक्षित घोषित केली होती.
काल स्लॅब कोसळल्याचा आवाज ऐकून आपल्या कार्यालयात बसलेले नगरसेवक दाजी साळकर व नगरसेविका रोचना बोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्यांमध्ये हुसेना बी (५०), मौजबी (३०), मुन्नी (३५), गुलशन खान (२४), सलीम (५०), समरीन (१५), कयान (१०), तस्मिजा खान (४) व युनूस (२) यांचा समावेश आहे.