Home बातम्या वासनाकांड; पीडितांनान्याय देणार : फळदेसाई

वासनाकांड; पीडितांनान्याय देणार : फळदेसाई

0

कुडचडे येथील वासनाकांड प्रकरणाच्या तपासात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणातील संशयित आरोपींची गय केली जाणार नाही, तर पीडितांना न्याय मिळवून दिला जाणार आहे, असे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल सांगितले. राज्य सरकारने कुडचडे येथील कथित वासनाकांड प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविला आहे. गुन्हा विभागाकडून या प्रकरणात पारदर्शक पद्धतीने तपास केला जाणार आहे. या प्रकरणाच्या तपासात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. पीडितांना न्याय निश्चित मिळेल, असेही फळदेसाई यांनी सांगितले.