वापराविना असलेले खाणखंदक सौरऊर्जेसाठी वापरणार ः सुदिन

0
13

राज्यातील वापराविना असलेले खाण खंदक जलविद्युत, सौरऊर्जा निर्मितीसाठी वापरण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी एका कुर्टी फोंडा येथे वीज खात्याच्या एका कार्यक्रमात बोलताना काल दिली. यावेळी जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची उपस्थिती होती. सुमारे ५० हजार चौरस मीटरच्या खाणीचा वापर सौरऊर्जेद्वारे अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी केला जाणार आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी दिल्लीचे एक पथक गोव्याला भेट देणार आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी आगामी सहा महिन्यात केली जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.