दोन रेल्वे रुळ जोडणार्या ‘स्लीपर’ वर लोखंडी सळी घेऊन काम करत असताना वेगाने ही सळी मारुती सदाशिव काणकणी (वय १९) याच्या थोबाडावर बसल्याने तो मरण पावला. काल सकाळी कुळे रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर मारुती हा कामगार काम करत असताना सदर घटना घडली.
वास्को रेल्वे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक हिरू कवळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी ७ वाजता ही घटना घडली. मारुती हा कामगार रेल्वे रुळांच्या पटरीवर लोखंडी सळी घेऊन काम करता असताना ही सळी अचानक त्याच्या हातातून सुटून वेगाने येऊन त्याच्या थोबाडावर बसून तो जखमी होऊन बेशुद्ध पडला. याबाबत १०८ रुग्ण वाहिकेला कळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर पोचून मारुतीला उपचारासाठी नेले. मात्र तो मरण पावला. तो बेळगावचा रहिवासी आहे.